School time love story

“My Dream” ( माझं स्वप्न ) – Sagar gawade

प्रेमकथेची सुरुवात ।
ही प्रेम कथा एका व्यक्तीच्या जीवनावर आधारित असल्यामुळं या कथेचे खूप भाग होतील आणि त्यामुळे या मध्ये जे नाव ( कॅरेक्टर ) मी वापरणार आहे ते पण दुसऱ्या नावाने वापरणार आहे आणि शेवट कधी होईल ते मला ही माहीत नाही त्यामुळं…
आपण सर्वांनी ही प्रेम कथा आपल्या प्रतिलिपी कलेक्शन मध्ये जमा करून ठेवा म्हणजे तुम्हाला जेंव्हा वाटेल तेंव्हा तुम्ही ती वाचू शकता ,आता या पहिल्या भागात फक्त कथेचे पूर्ण स्वरूप}  आणि लेखकाविषयी थोडीशी माहिती एवढेच असणार आहे ।

नमस्कार मित्रांनो मी सागर गावडे, मी पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील गावडेवाडी या गावात राहतो ।एवढी माहिती पुरेशी आहे असं मला वाटत????
आज मी एक लव स्टोरी घेऊन आलो आहे ,

मला आधीपासूनच वाचनाची आवड आहे ,आणि  त्या वाचनाच्या बळावरच मी आज पहिल्यांदा अशी प्रेमकथा लिहिणार आहे, प्रेमकथा म्हणलं की बहुतेक लोक फक्त Title वाचतात ,आणि पुढे जातात पण त्यातही असे काही लोक आहेत की ज्यांना या गोष्टीं मध्ये आवड आहे ते आवर्जून वाचतात आणि आवडलं तर कथे खाली कॉमेंट पण करतात।

मी आज या कथेमधून तुम्हांला प्रेमाच्या अनंत सागरात वाहून नेणार आहे ????कारण ही प्रेम कथा एका व्यक्तीच्या जीवनावर आधारित आहे ,त्या व्यक्तीचे नाव मी या कथेच्या शेवटच्या भागात सांगणार आहे त्यामुळं कुणीही विनंती करू नका ???? अशी विनंती …?

ती व्यक्ती आधी काय होती आणि ती त्याच्या आयुष्यात आल्यामुळे त्याचे जीवन कसे बदलून गेले अस खूप काही आहे ,सगळे आताच सांगितल्यावर तुम्ही पुढचे भाग वाचणार नाही ,हे मला ठाऊक आहे ..?????

आज या कथेला सुरुवात करणार असून मला तुमच्या सर्वांचा पाठींबा व भरभरून प्रेम मिळेल अस गृहीत धरून मी कथेला सुरुवात करतो।

ही रोमॅंटीक लव्ह स्टोरी असल्यामुळं कुठून सुरुवात करू सुचत नाही,आम्ही एकमेकांना ओळखत नव्हतो, म्हणजे एका गावात राहायला असून कधी एकमेकांना  पाहिलं ही नव्हते, मला कधीच अस वाटलं नव्हतं की तिच्या बरोबर मला पूर्ण आयुष्य काढावं लागेल ।

जून 24 – 2017 तिला पहिला मेसेज केला fb ला कारण तिने माझ्या एका पोस्ट ला like केलं होतं ????, आता जनरली कस असते ,मुलांनी आपल्या पोस्ट ला किती पण लाईक-कमेंट करू द्या, पण एखाद्या मुलीने केलं तर पहिला मेसेज तिला मग बाकीच्यांना ,मी ही त्याच कॅटेगरीत मोडतो अस म्हणण्यात काही गैर नाही????

त्यानंतर पुन्हा तिने सप्टेंबर 8-2019 ला पुन्हा Like केलं मग मी पुन्हा “थँक्स” बोलो .
मग 13 सप्टेंबर 2019 ला तिला पुन्हा मेसेज केला.

मी- तू मला ओळ्खतेस..?
ती- नाही .

मग आमचं बोलणे चालू झालं, मला ही तेच पाहिजे होत म्हणजे थोडं ओळख वाढवायचं म्हणल्यावर
“इतना तो बनता हे…?????

बोलता बोलता ती मधेच बोली की “मी का सांगू तुम्हाला  मी नाही ओळखत ..?

मग मी विषय चेंज करत बोलो की माझ्या friend ला जॉब पाहिजे होता भेटेल का..?

मग ती बोली की तुम्ही तर लगेच जॉब सेटिंग लावायला सुरुवात केली।????

मग असच बोलणे चालू होतं ( आम्ही chat करतोय विसरू नका???? )  तर ती बोली की “तुम्ही तर अस बोलताय की जसे आपण खूप पहिल्या पासून एकमेकांना ओळखतो”

नंतर 4 ते 5 दिवस जसे वेळ मिळेल तस आम्ही बोलत होतो अजूनही आम्ही एकमेकांना ओळखत नव्हतो,
फक्त नाव माहीत होतं एकमेकांना,
मग मी तिला मेसेज मध्ये बोलो की आपण भेटूया का एकदा म्हणजे मग ओळख होईल अजुन..?
तर ती बोली I M VERY BUSY …घरी काम असते …?
(जसे आम्ही मोकळेच दिवसभर  नाही का..?????)

मग ती बोली की घरच्या जबाबदाऱ्या असतात, आई नाही मला ….?????

{ मित्रांनो तस पाहिलं तर मी ही स्टोरी काल म्हणजे बुधवारी टाकणार होतो पण वेळ न मिळाल्या मूळ ती आज पोस्ट करतोय आणि ती ही एवढ्या उशिरा आता 1 वाजून गेलेत (त्याबद्दल मी सर्वांची माफी मागतो )

हा पहिला पार्ट जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की कॉमेंट्स करून सांगा म्हणजे मला समजेल की तुमचं मत काय आहे आणि तुमच्या मनातील भावना पण माझ्या पर्यंत पोहोचतील ।

(क्रमशः)

(वरील लिखाणाचे सर्व अधिकार लेखकाच्या अधीन आहेत. कृपया या लेखणाचा वापर लेखकाच्या परवानगी शिवाय कुठेही करू नये ही नम्र विनंती)

Do you have a story? Click here to submit it / Connect with the admin

38 thoughts on ““My Dream” ( माझं स्वप्न ) – Sagar gawade”

 1. बहुत ख़तरनाक बहुत बढ़िया
  गजब
  मुझे बहुत अच्छा लगा

 2. मुझे बस इतना बता दो कि तुमने संस्कृत कहा से सीख।
  मुझे भी सीखना है।????‍♂️????pl

 3. sapne toot jate hai,
  apne ruth jate hai,
  mager jb v ho ap jaise dosto ka sath,
  raho me kate v phool bn jate hai.

 4. akho me tera chehra,
  khusbu hai sanso me..!!
  din rat tu rahta hai meri yado me..!!
  ek sajan chahiye ekrar k liye,
  bin sajan k ek v pal achha ni..! lagta..!!
  a bidiya chudi kangan acha ni lagta..!
  ek sajan chahi pyar k liye
  bin sajan k angan acha ni lagta

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *